गावठी दारूची विक्री भोवली : 27 अटकेत ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त


Village Liquor Sale Bhovali: 27 Arrested ; Two lakh worth of goods seized जळगाव : राज्य उत्पादन शुक्ल व जिल्हा पोलीस दलातर्फे गावठी दारूची विक्री आणि वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा धडाका सुरू असून शनिवार, 19 ऑगस्ट रोजी पथकाने जळगाव तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई करत एकुण 29 गुन्हे दाखल केले. 27 जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईत दोन लाख चार हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव जिल्हा पोलीस दल आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने 17 आणि 18 ऑगस्ट रोजी गवठी दारू बनविण्याच्या हातभट्टीवर छापेमारी करून लाखो रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आता पथकाने शनिवारी 19 ऑगस्ट रोजी जळगाव तालुक्यात अवैधरित्या दारू वाहतूक करणे आणि गावठी दारू विक्री करणार्‍यावर कारवाईचा धडका लावला आहे. पथकाने कारवाई करत एकुण 27 जणांना अटक केली आहे. याबाबत वेगवेगळे 29 गुन्हा दाखल करण्यात आले. पथकाने केलेल्या कारवाई कच्चे रसायन, तयार गावठी दारू, देशी दारू, दोन मोटारसायकली असा एकूण दोन लाख 4 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !