ईडीच्या भीतीनेच काहींनी राष्ट्रवादी सोडली : शरद पवारांच्या दाव्याने पुन्हा खळबळ
Some left NCP because of fear of ED : Sharad Pawar’s claim stirs up excitement again पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपशी हातमिळवणी केलेल्या अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांवर टिकेचे बाण चालवले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया कार्यशाळेत शरद पवार म्हणाले की, ‘ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) कारवाईच्या भितीने आमच्यातले काहीजण भाजपसोबत गेले आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच आहोत. आम्ही आमची वैचारीक भूमिका बदलली नाही. तुरुंगात जावं लागू नये, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सत्याची कास सोडून असं वागणार्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका शरद पवारांनी केली.
महाराष्ट्राच्या तरुणांचा रोजगार गेला
पवार म्हणाले की, आज देशात महागाई, गुन्हेगारी वाढत आहे. शेतकर्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. गेल्या सहा महिन्यांत गुजरात किंवा अन्य राज्यात किती प्रकल्प गेले. जो कारखाना राज्यात येणार होता, तो अन्य राज्यात गेला. चांगली कामे करण्याची संधी राज्य सरकारने गमावली आहे. तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्य काढा, परंतु जे कारखाने इथे येणार होते, ते तिकडे नेणं योग्य नाही. यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार गेला,’ असंही ते यावेळी म्हणाले.

चॅनल मालकांनाही मिळतेय धमकी
देशाचे महत्वाचे नेते सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते नेहमी बातम्यांवर लक्ष ठेवून असतात. कुणी काही टीका टिप्पणी केली की, शासनाच्या महत्वाच्या व्यक्तींकडून त्या चॅनलला फोन करुन इशारा दिला जातो. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या संसारात हात घालण्याचे काम केंद्राने केल. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले. कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकर्यांसाठी जगातले मार्केट बंद झाले,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
