रावेर निरीक्षक रामदास वाकोडे यांचा ‘शांतीदूत’ पुरस्काराने सन्मान
रावेर : रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना शहरातर्फे ‘रावेर शांती दूतपुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. रावेर येथील अंबिका व्यायाम शाळा बहुद्देशीय मंडळ तसेच सर्वधर्मीय सेवा समिती पुरस्कृततर्फे सोमवारी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
रावेरात शांतता निर्माण केल्याने पुरस्कार
4 सप्टेंबर 208 रोजी निरीक्षक वाकोडे यांनी रावेरची जबाबदारी स्वीकारल्यापासून रावेर शहर तसेच रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात आले तसेच गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून नावलौकीक त्यांनी मिळवला. रावेर शहर व हद्दीतील गणपती उत्सव, देवी उत्सव तसेच इतर उत्सव, यात्रा तसेच अपघात, महापूर, जातीय तणाव अश्या बाबी कौशल्याने हाताळून तसेच रावेर शहरातील हिंदू, मुस्लीम, बौध्द आणि आदिवासी यांच्यात एकोपा घडवून आणला. रावेर शहरात शांततेचे वातावरण निर्माण करण्यात महत्वाचा असलेला वाटा तसेच पोलिसांचा वचक व कायद्याची भीती निर्माण करण्यात वाकोडे यांना यश आले शिवाय येणारा तक्रारदार श्रीमंत असो किंवा गरीब यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांना कसोशीने प्रयत्न केल्यानेच रावेरवासीयांच्या मनात शांतीदूत म्हणून भावना निर्माण केल्याने सर्व धर्मीय रावेर वासीयांनतर्फे ‘रावेर शांतीदूत’ हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

