जळगावात चोरटे शिरजोर : बसस्थानकात तीन महिलांच्या मंगलपोतवर डल्ला


Thieves attack in Jalgaon : Three women were assaulted at the bus station जळगाव : नवीन बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करीत असलेल्या तीन महिलांकडून मंगलपोत चोरट्यांनी लांबवल्याची घटना रविवारी घडल्याने खळबळ उउाली. दोन महिलांना हा प्रकार लागलीच लक्षात येताच त्यांना तुटलेली पोत मिळून आली. नवीन बस स्थानक परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळेच चोरटे अधिकच सक्रीय झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

तीन महिलांच्या मंगलपोत चोरीला
शहरातील नवीन बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बसमध्ये चढतांना याच गर्दीचा फायदा घेत लहान मुले महिलांच्या गळ्यातील किंवा त्यांच्या पर्समधील सोने चांदीचे दागिने लांबवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. दरम्यान, रविवार, 20 ऑगस्ट रोजी दिवसभरात नवीन बस स्थानकामधून तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व पोत लांबविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. पोत ओढल्यानंतर महिलांना गळ्यातील पोत कोणीतरी ओढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोत सुरखुप राहिली तर एका महिलेच्या गळयातील पोत चोरण्यास चोरटे यशस्वी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसात नोंद नसल्याचे समजते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !