एरंडोल शहरातील तिघे तरुण रामेश्वर त्रिवेणी संगमावर बुडाले : दोघांचा मृतदेह आढळला


Three youths from Erandol town drowned at Rameshwar Triveni confluence: bodies of two found एरंडोल : कावड यात्रेनिमित्त जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर कावड यात्रेसोबत आलेले एरंडोल शहरातील तिघे तरुण नदीपात्रात बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तापी पात्रात बुडालेल्या तिघांचा शोध घेतला जात असून त्यातील दोघांचे मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यावरून आपत्ती व्यवस्थापनाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले असून तिसर्‍या बेपत्ताचा तरुणाचा शोध घेतला जात आहे.

पाण्यात बुडाले तिघे तरुण
श्रावण सोमवारनिमित्त जळगाव जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत असताना अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी सोमवारी आले आहेत. एरंडोल शहरातील काही तरूण हे सोमवार, 21 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा-तापी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर काही तरुण तापी पात्रात स्नानासाठी उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आणल्याने तिघे बुडाले. सोबतच्या तरुणांनी याप्रकाराची माहिती स्थानिकांना व प्रशासनाला दिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.







पोलीस अधिकार्‍यांची धाव
तिघे तरुण तापी पात्रात बुडाल्याची माहिती कळताच पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पट्टीच्या पोहणार्‍या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली तर तिसर्‍या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परीरविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने एरंडोल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

श्रावण सोमवारनिमित्त एरंडोल शहरातील भगवा चौकातील ५० तरुणांचा एक गट सोमवार, २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुक्यातील गिरणा, तापी आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदिरावर कावडयात्रा घेऊन दर्शनासाठी गेला. तेथे दर्शन घेऊन दुपारी साडेतीन वाजता पियुष रवी शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३) व अक्षय प्रवीण शिंपी (२२) पोहण्यासाठी  तापी नदीत उतरले. त्या वेळी त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व तिघेही जण पाण्यात बुडाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !