‘अशपाकराम’ एकपात्री नाट्यप्रयोगाने भुसावळकर भारावले


भुसावळ : पु.ओ.नाहाटा महाविद्यालय आणि उत्कर्ष कलाविष्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व स्व.देविदास गोविंद फालक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विमर्श, मुंबई निर्मित सुधीर विद्यार्थी लिखित आणि मनीष मुनी दिग्दर्शीत ‘अशपाकराम’ या बहुचर्चित एकपात्री नाट्यप्रयोगाने भुसावळकर भारावले. शनिवार, 25 रोजी रोजी नाहाटा महाविद्यालयात या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रारंभी ज्येष्ठ नागरीक रघुनाथ आप्पा सोनवणे, सुबोध मोरे, रंगकर्मी संजय साळी, डॉ.दिलीप देशमुख आणि अनिल कोष्टी यांच्या हस्ते नटराज पूजन व स्व.देविदास गोविंद फालक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी चंद्रकांत चौधरी आणि धनश्री जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर एकपात्री प्रयोगाला सुरुवात झाली.

नाटकांचे अत्यंत भावस्पर्शी सादरीकरण
क्रांतीकारक अश्फाक उल्लाह खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री निव्वळ भावनात्मक नव्हती, ही दोस्ती स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या दोन अलौकिक जीवांची होती. एका ध्येयाने पछाडलेल्या, वैचारिक भूमिकेला एकरूप करणारी होती. ही दोस्ती प्रचंड ताकदीने देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आसुसलेली होती. ही दोस्ती धार्मिक सौहार्दाची भारतीय परंपरा पुढे नेणारी आणि प्रेरणादायी होती, असा संदेश देत हिंदी भाषेतील गोडवा, आणि आपल्या कायिक, वाचिक अभिनयातून मंत्रमुग्ध करणारा प्रयोग मनीष मुनी यांनी सादर केला. ब्रिटिशांच्या विरुद्ध काकोरी स्थानकावर रेल्वे लूट करून चार क्रांतीकारकांनी बंड केले, हसत हसत फासावर चढले. हे सर्व शाहाजानपूर (उ. प्र.) रहिवासी होते. या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते मनिष मुनी ही त्याच शहरातील असल्याने, अत्यंत भावस्पर्शी सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांचे मन हेलावून सोडले.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी डॉ.दिलीप देशमुख, सत्यपालसिंग राजपूत, धर्मराज देवकर, किरण बाविस्कर,योगेश गाडगीळ, कुंदन तावडे, देवेश कुलकर्णी, उमेश गोरधे, नयन पवार, विजय ठाकरे, प्रथमेश जोशी, निखील नायदे, विजय नारखेडे, श्रीकांत कुलकर्णी, वैष्णवी तांबट, पुष्कराज शेळके, बुद्धभूषण सावळे,रचना महाजन, श्रीकांत जोशी, रवीकांत कोळी, रवीकांत सुपेकर, श्रीराम पाटील संजय चव्हाण, वेदाली जोशी, राहुल वरखेडे यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !