कंडारीतील महिलेची बस प्रवासात सोन्याची पोत लंपास


A woman in Kandari wears gold during bus travel जळगाव : जळगाव-जामनेर बसमधून प्रवास करणार्‍या कंडारीतील महिलेची भामट्यांनी प्रवासात पोत लांबवी. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा कसून शोध
रंजना अनिल चव्हाण (19, कंडारी, ता.जि.जळगाव) या सोमवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी जळगाव ते जामनेर दरम्यान बसमध्ये प्रवास करीत असताना बसमधील पारू गणेश चव्हाण (28, रा.वजीरखेडा, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद) आणि तिच्यासोबत असलेल्या 15 वर्षीय व 10 वर्षीय अल्पवयीन दोन मुली यांनी महिलेच्या गळ्यातील 10 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महिला पारू गणेश चव्हाण यासह दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !