फैजपूरात शोभायात्रेने 27 कुंडी महाविष्णु याग महोत्सवाला सुरुवात


फैजपूर : शहरात सोमवारपासून सुरू झालेल्या 27 कुंडी महाविष्णू याग महोत्सव व नामसंकीर्तन महोत्सवाला रविवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खंडोबावाडी देवस्थानात हा 27 कुंडी महाविष्णू याग महोत्सव साजरा होत आहे. याच ठिकाणाहून रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत यात्रेच्या अग्रस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणीचा सजीव देखावा दाखविण्यात आला. यानंतर शोभायात्रेत डोक्यावर तुळशीपत्र तसेच भागवत ग्रंथ घेतलेल्या महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या शोभायात्रेत सजविलेल्या बग्गीतून महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज व प्रसाद महाराज तसेच कुसुंबा येथील महंत भरत दास महाराज व संतांना बसवण्यात आले.

दररोज नामवंत कीर्तनकारांचे होणार कीर्तन
शोभायात्रा खंडोबा देवस्थान, रथगल्ली, लक्क्ड पेठ, सुभाष चौक या मार्गाने सुभाष चौक त्यानंतर पुन्हा खंडोबा वाडीत आली व शोभायात्रेचा समारोप झाला. 27 कुंडी महाविष्णू यागानिमित्त महोत्सव समितीतर्फे तयारी पूर्ण झालेली असून भव्य व आकर्षक यज्ञशाळा तसेच नाम संकीर्तन महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. या महोत्सवात दररोज नामांकित कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !