जळगाव पोलीस दलातील 15 सहाय्यक निरीक्षक व 15 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या
Transfers of 15 Assistant Inspectors and 15 Sub-Inspectors of Police in Jalgaon Police Force जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातील 15 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 15 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकार्यांना नवीन पदाचा पदभार तात्काळ घेण्याचे निर्देश देखील पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
अधिकार्यांच्या बदल्या
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सक्षम प्रधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहे. यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणूका, प्रशासकीय बदली बाबत सर्व बाबींचा विचार करून पोलीस प्रशासनाकडून सोमवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत आदेश काढण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 15 पोलीस उपनिरीक्षक अशा 30 पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले.
