यावल-भुसावळ रस्त्यावर अवैद्य गौण खनिज वाहतूक करणारे दोन डंपर जप्त


Two dumpers transporting illegal secondary minerals on Yaval-Bhusawal road seized यावल : भुसावळ रस्त्यावरील पाटचारीच्या पुढे असलेल्या घोडेपीर बाबाच्या दर्गाजवळ अवधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन डंपर तहसीलदारांनी पकडल्याने अवैध वाळू वाहतूकदार धास्तावले आहेत. दोन्ही डंपर चालकांकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याने हे डंपर तेथून ताब्यात घेत तहसील कार्यालयात लावण्यात आले. डंपर मालकांना दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आल्याने कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

तहसीलदार प्रशासनाच्या कारवाईने खळबळ
यावल-भुसावळ रस्त्यावर पाटचारीच्या पुढे घोडे पीर बाबांचा दर्गा आहे. या दर्गाजवळ तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या सह असलेल्या पथकाला डंपर (क्रमांक एम.एच.19 डी. डब्ल्यू. 5166) व डंपर (क्रमांक एम.पी.47 एच. 0160) हे दोघे दिसून आले. यात एकामध्ये डबर तर एकामध्ये मुरूम होता. डंपर चालकांना थांबवून तहसीलदारांनी त्यांच्याकडे परवाना विचारला मात्र त्यांच्याकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याने डंपर तहसीलदारांनी पंचनामा करीत ताब्यात घेतले आहे.







डंपर मालक आर.डी.पाटील (रा.यावल) तसेच गणेश पाटील (भुसावळ) यांना दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, तलाठी ईश्वर कोळी, वसीम तडवी, एस.व्ही.सूर्यवंशी, अरविंद बोरसे यांच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !