जळगावातील विवाहितेचे लग्नानंतर अनैतिक संबंध : कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
Immoral relationship of married couple in Jalgaon after marriage : Bored young man took extreme step जळगाव : लग्नानंतर पत्नी गल्लीतील तरुणाच्या प्रेमात अडकल्यानंतर दोघांनी धमक्या मिळू लागल्याने त्रस्त पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीसह प्रियकराच्या त्रासाने उचलले टोकाचे पाऊल
शहरातील गेंदालाल मिल परिसरात विजय महाजन हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याच्या पत्नीचे त्याच परीसरातील अजय ज्ञानेश्वर शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर विजय महाजन व त्याचा भाऊ गणेश महाजन हे दोघ अजय शिंदे याला समजविण्यासाठी गेले असता, त्याने दोघांना शिवीगाळ करीत धमकी दिली तसेच विजय महाजन याला फोनवरुन तुझ्या पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असून मी तिला एक दिवशी पळवून घेवून जाईल, तुझ्याकडून काय होईल ते करुन घे अशी धमकी देखील देत होता.






तसेच मयत विजय याची पत्नी देखील काहीना काही कुरापती काढून पतीसोबत भांडण करीत असायची. दोघांच्या जाचाला कंटाळून विजय याने 25 नोव्हेंबर 2021 रोजी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी मयताची पत्नी व तिचा प्रियकर अजय ज्ञानेश्र्वर शिंदे (रा. गेंदालाल मिल) या दोघांविरुद्ध आत्हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश शेंडे करीत आहे.


