जळगावातील बालसुधारगृहात बालिकेची गळफास घेत आत्महत्या
A girl committed suicide by hanging herself in a juvenile correctional home in Jalgaon जळगाव : जळगावातील बालसुधार गृहातील शौचालयात 14 वर्षीय बालिकेने शनिवार, 12 ऑगस्ट रोजी गळफास घेतला व हा प्रकार लक्षात येताच बालिकेला तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतांना मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पूनम सुरेश भील (14, अमळनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अमळनेर येथील पूनम भील ही मुलगी जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परीविक्षा निरीक्षण गृहात होती. पूनम हिला घरी जायचे होते.परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसर्याच दिवशी तिने गळफास घेतला. तिच्यावर 11 दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








