विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीला छळले : पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा


Tortured wife by having extramarital affair: Case against five persons including husband and father-in-law जळगाव : लग्नानंतरही दुसर्‍या महिलेशी प्रेमप्रकरण असणार्‍या पतीने त्याच्या पत्नीचा छळ केला तसेच माहेरुन 45 लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे छळ प्रकरण
जळगाव तालुक्यातील भोकर येथील माहेर असलेल्या अश्विनी किरण पाटील (22) यांचा किरण उज्जैन पाटील यांच्याशी विवाह झाला. विवाहितेने माहेरुन 45 लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला जाऊ लागला. तसेच किरण पाटील यांचे दुसर्‍या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्यानेही विवाहितेला मारहाण करण्यात येत होती. अशी फिर्याद विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पती किरण उज्जैन पाटील, सासरे उज्जैन लोटन पाटील, सासू कुसुम पाटील, नणंद व पतीची मैत्रिण यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार किरण अगोणे हे करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !