भुसावळात धाडसी घरफोडी : 53 हजारांचा ऐवज चोरीला
Daring burglary in Bhusawal: 53 thousand stolen भुसावळ : शहरात मुक्कामी असलेल्या चोरट्यांनी नवीन ईदगाहमागील बंद घरात धाडसी घरफोडी करीत सुमारे 53 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
नवीन ईदगाह मागील अरबी मदरसाजवळ मोईनोद्दीन कयोमोद्दीन काझी (33, भुसावळ) हा तरुण कुटूंबासह वास्तव्याला आहे. 23 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तरुणाचे घर बंद असल्याची संधी साधत घरातून दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 16 हजार रुपये किंमतीचे ब्रासलेट, हार व झुमके तसेच 12 हजारांची रोकड व 15 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 53 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काझी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार निलेश चौधरी करीत आहे.








