भुसावळात रेल्वेच्या पार्किंगमध्ये आढळल्या चार बेवारस दुचाकी


शहर पोलिसांनी वाहने केली जप्त ; मूळ मालकांनी संपर्क साधण्याचे अ ावाहन

भुसावळ : जंक्शन स्थानकाच्या उत्तर बाजूला असलेल्या पार्किंग स्टॅण्डमध्ये शहर पोलिसांना चार बेवारस दुचाकी आढळल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा दुचाकी येथेच पडून असून परराज्यातून त्या येथे चोरी करून आणल्या असाव्यात असा संशय आहे. गुरुवारी स्वातंत्र्य दिन असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासणीत पार्किंगमध्ये बेवारस दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मूळ मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन
मूळ मालकांनी या दुचाकींची मूळ कागदपत्रे दाखवून ओळख पटवावी, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी केले आहे. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे हवालदार मो.अली सैय्यद, समाधान पाटील, संजय बडगुजर यांनी दुचाकी जप्त केल्या. जप्त दुचाकींमध्ये टीव्हीएस स्टार (ए.पी.15-3161), बजाज डिस्कव्हर (एम.एच.19-8033), विना क्रमांकाची डिस्कव्हर तसेच दुचाकी (क्रमांक जीजे 1-एल.डी.9060) चा समावेश आहे. गुरवार.


कॉपी करू नका.