महाराष्ट्रातील कुठल्याही बंदमध्ये सहभाग नाही : महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा ठराव
नाशिक : सतत होणार्या बंद आणि आंदोलनामुळे व्यापारी वैतागले असून यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याचे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, राज्यभरात व्यापार्यांनी ठराव मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.