न्यायालयीन तारखेवर गैरहजेरी : भुसावळातील आरोपीस अटक
भुसावळ : खावटीच्या खटल्यात न्यायालयीन तारखांवर सतत गैरहजर राहणार्या भुसावळातील आरोपीविरुद्ध पकड वॉरंट निघाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी त्यास अटक केली आहे. अशोक नारायण राजपुत (38, रा.आरएमएस कॉलनी, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भुसावळातील अप्सरा चौकात आरोपी आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बोदडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे आदींनी केली.

