बस-रीक्षा अपघातातील मृतांची संख्या पोहोचली 21 वर
34 प्रवासी जखमी : अपघातग्रस्त वाहने विहिरीबाहेर काढण्यात यश : मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती
देवळा : भरधाव बस व रीक्षामध्ये धडक होवून झालेल्या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने अॅपेतील नऊ प्रवासी तसेच बसमधील बस चालकासह एकूण 21 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 34 प्रवासी जखमी झाले. जमंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास धोबी घाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहने रात्री उशिरा पाच क्रेनच्या सहाय्याने काढण्यात यश आले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांना जखमींना हलवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तर पोलिस प्रशासनासह एनडीआरएफच्या पथकाने धाव घेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, या बसमध्ये 46 प्रवाशांसह चालक व वाहक मिळून 48 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.
बसचा टायर फुटल्याने अपघात
कळवण आगाराची बस (एम.एच.06 एस.8428) ही चालक पी.एस.बच्छाव व चालक के.एल.राऊत ही नेत असताना धुळे-कळवण मार्गावरील धोबी घाट, देश-विदेश हॉटेलजवळ आल्यानंतर मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आल्यानंतर बसचे टायर फुटल्याने तिने एका अॅपे रीक्षाला धडक दिल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या परीसरात शिरल्यानंतर बसने काही अंतरापर्यंत अॅपेला फरफटत विहिरीच्या कठड्याला धडक दिली मात्र बसचा वेग अधिक असल्याने बस कठडा तोडून अॅपेसह विहिरीत कोसळली. अपघातानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी प्रचंड आक्रोश केला तर अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावून आले.


