यावल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू


यावल : यावल ग्रामीण रुग्णालयातील वॉटर बॉय म्हणून ड्युटीवर असलेले वासुदेव संपत कोळी (55) यांचे मंगहवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परीवार आहे. दुपारच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना पुढील औषधोपचारासाठी जळगावी हलवण्यात आले असता यावल शहरापासून अवघ्या काही अंतरावर त्यांचे निधन झाले. पुन्हा त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, बुधवारी सकाळी 10 वाजता विठ्ठलवाडी भागातील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !