सत्तेवर असताना शरद पवारांनी आरक्षणांसाठी काय केले ? भाजपाने केली टिका
What did Sharad Pawar do for reservations when he was in power? BJP criticized मुंबई : सत्तेत असताना शरद पवारांनी मराठा समाज आरक्षणासाठी काय केले ? असा प्रश्न आता भाजपाने शरद पवारांच्या टिकेनंतर उपस्थित केला आहे. मराठा समाजाला शांत करण्यासाठी त्यांनी काय केले? आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या, तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी काय प्रयत्न केले? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
मुंबईवरून फोन आल्यावर लाठीमार झाल्याचा शरद पवारांचा दावा
जालना येथे आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने वातावरण अधिकच तापल्यानंतर आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईवरून फोन आल्यानंतर लाठीमार करण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्याने या वक्तव्याचे आता राज्यात पडसाद उमटत आहेत. भाजपाकडून प्रत्युत्तर देताना शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरीत्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

शरद पवारांची दुटप्पी भूमिका
याबाबत केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये केशव उपाध्ये यांनी लिहिले की, शरद पवार यांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल. मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले असल्याचे उपाध्ये यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
