धुळ्यात बंदला गालबोट : जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत झाडल्या बंदुकीच्या चार फैरी


जमावाने दुचाकी जाळल्या तसेच हातगाड्याही उलथवल्या : जमावाच्या दगडफेकीत पोलिस उपअधीक्षकासह 12 पोलिस जखमी

धुळे : धुळ्यात सीएए व एनआरसी कायद्याच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर संतप्त जमावाने दोन दुचाकी जाळल्या तसेच अनेक हातगाड्या उलथवल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दगडफेक करणार्‍यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या चार फैरी झाडल्याचे सांगण्यात आले तर जमावाने केलेल्या दगडफेकीत दगडफेकीत पोलिस उपअधीक्षक हिरे, पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांच्यासह 12 कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले तसेच स्थिती परीस्थिती नियंत्रणासाठी कठोर पवित्रा घेत पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे सांगण्यात आले.

जमावाने दुचाकीसह चारचाकी पेटवली
सकाळी 11 वाजेता चाळीसगाव रोड चौफुलीवर मुरूम टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात आला तसेच चाळीसगाव चौफुली रोडवर असलेल्या 100 फुटी रस्त्यावर अज्ञातांनी दोन दुचाकी तसेच चारचाकी जाळली तसेच काही हातगाड्याही उलथवून देण्यात आल्या. साक्री रोडवरही काहीवेळ तणाव निर्माण झाला तर शहरातील अकबर चौक, भंगार बाजार परीरसर, चाळीसगाव चौफुली, 100 फुटी रोड, 80 फुटी रस्त्यावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

शिरपूरात बसवर दगडफेक
शिरपूर येथे बुधवारी सकाळी पावणेदहाला एसटीवर दगडफेक झाली. त्यात दोन प्रवासी जखमी झाल्यानंतर या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

चाळीसगाव रोडवर वाहने जाळली
बुधवारी दुपारी एक वाजेनंतर धुळे शहरातील चाळीसगाव व मालेगाव रोडला जोडणार्‍या नवीन शंभर फुटी रस्त्यावर आलेल्या जमावाने काही भंगारातील वाहने आणि मोटारसायकली जमावाने जाळल्या तसेच काही वाहनांवर दगडफेक करीत टपर्‍यादेखील उलथवल्या. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. एसआरपीच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने पोलिस उपअधीक्षक हिरे यांच्यासह एसआरपीच्या जवानांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत चार राउंड फायर केले. दगडफेकीत पोलिस उपअधीक्षक हिरे, पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांच्यासह 12 कर्मचारी जखमी झाले. स्थिती नियंत्रणासाठी कठोर पवित्रा घेत पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !