जळगावात खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार ! : प्रत्येक फाईलीवर फडणवीसांकडे जावे लागत असल्याने तुमचा स्वाभिमान गेला कुठे ?


Ajit Pawar on the target of Khadse in Jalgaon ! : Where has your self respect gone as you have to go to Fadnavis for every file? जळगाव : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार हा गृहखात्याकडून झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे सिद्ध करून दाखवल्यास मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राजकारण सोडणार असल्याचे आव्हान दिले होते व त्यानंतर आता राष्ट्रवादीने त्यांनी लक्ष्य केले आहे. जळगावातील सागर पार्कवर आयोजित मंगळवारच्या सभेत नाथाभाऊंच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस व अजित पवार दिसून आले. आपल्या आक्रमक शैलीत नाथाभाऊ म्हणाले की, स्वाभिमानी नेता म्हणून अजितदादांची ओळख होती मात्र आता प्रत्येक फाईलीवर स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीसांकडे जावे लागत आहे त्यामुळे त्यांचा स्वाभिमान आता कुठे गेला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी शऱद पवार हेदेखील व्यासपीठावरच होते.

खडसे म्हणाले ; हा तर अजित पवारांचा केव्हढा अपमान !
खडसे म्हणाले की, अजित दादांनी भाजपात जावून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले मात्र स्मार्ट असलेला माणूस, काम करणारा माणूस पक्ष बदलवल्यानंतर निर्णय घेवू लागला. साखर कारखान्यांवर याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, निर्णय झाला, स्वाक्षरी झाली मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा निर्णय रद्द करून टाकला. हा केवढा अपमान आहे? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित करीत अजित पवारांवर निशाणा साधला. राज्यात मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असल्याने दोन बायका फजिती ऐका अशी स्थिती झाल्याचा टोलाही त्यांनी हाणला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !