भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार आकाश चॅम्यियन दोन वर्षांसाठी हद्दपार


Akash Chamian, a notorious criminal from Bhusawla, exiled for two years भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत बाजारपेठ पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सादर केले होते. प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ चॅम्यियन श्याम इंगळे (21, पंचशील नगर, भुसावळ) यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले आहेत.

दरम्यान, चॅम्पियन विरोधात चोरी, लूटमार, हाणामारी, ठार मारण्याची धमकी आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची प्रांताधिकार्‍यांकडे पडताळणी होवून बुधवारी सायंकाळी आकाश उर्फ चॅम्यियन श्याम इंगळे यास दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आल्याने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.







दरम्यान, आगामी काळात काही गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !