आईनेच रचला कोवळ्या मुलीच्या हत्येचा डाव… कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का


It is the mother who hatched the plan to kill the young girl… You will be shocked to read the reason अकोला : मुलगी झोपल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आईने टाहो फोडला… या घटनेने समाजमन हळहळले तर पोलिसांनी केलेल्या तपासात आईच मुलीच्या हत्येची मारेकरी असल्याचे वास्तव उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या आईला अटक केली असून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. ही घटना बलोदे लेआऊटमध्ये घडली. याप्रकरणी आईविरोधात मुलीच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

दाम्पत्याच्या वादात चिमुकलीचा गेला बळी
नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्यानंतर तिचा मृत्यू बनाव आईने केला होता. पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या साडेपाच वर्षीय किशोरीच्या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणात आज खदान पोलिसांनी किशोरीची आई विजया आमले हिला खुन प्रकरणात अटक केली. किशोरीचे वडील रवी आमले यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा किशोरीच्या आईच्या विरोधात दाखल केला आहे.







घटस्फोट न दिल्याने मुलीची केली हत्या
लग्नापासून पती पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील केली होती. आणि या वादात किशोरीचा बळी गेल्याचे चित्र आहे. नाकाला चिमटा लावून किशोरी झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. तसा संशयच किशोरीच्या वडीलांना होता. त्यांनी पोलिसांना या संशयाबद्दल अवगत केले होते.

पोस्टमार्टम करताच उलगडले खुनाचे रहस्य
पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तपासात अनेक नव नवे खुलासे समोर आले. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचे केलेला बनाव समोर आला. तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तर तिच्या अंगावर आणि शरीरात मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे अधोरेखित झाल्याचे चित्र होते. या महिन्याच्या सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद किशोरीची घेतली गेली होती पण, पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणात किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलिस कर्मचारी करंदीकर, आकाश राठोड करीत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !