यावलकरांनीही स्वयंस्फूर्तीने पाळला बंद


यावल : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला व्यापारी बांधवांनी प्रतिसाद दिला. सकाळपासुन शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्यात आली तर काही भागातील व्यावसायीकांनी आपली दुकाने ही तुरळक स्वरूपात बंद ठेवल्याचे दिसून आले. बंदनिमित्त काढण्यात आलेल्या मोर्चात युवकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.

प्रशासनाला निवेदन
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भाजपा सरकारने देशात सीएए (नागरीकता संशोधन कायदा) एनआरसी (राष्ट्रीय नागरीकता नोंदणी) व एनपीआर (राष्ट्रीय लोक संख्या नोंदणी) अशा प्रकारे जुलमी कायदे आणण्यात आले असून सीएए कायद्याला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर तो राज्यसभेत मंजुरीसाठी आला. खरं म्हणजे सीएएला राज्यसभेत मंजुरी मिळायला नको होती मात्र राज्यसभेतही हा कायदा पारीत झाला. राज्यसभेत भाजपाचे बहुमत नाही पण सीएए राज्यसभेत मंजुरीसाठी आला असता काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी सभागृहातुन काढता पाय घेतल्याने बहुमतासाठी संख्याबळ कमी झाल्याने राज्यसभेत देखील सीएए कायद्याला मंजुरी मिळाल्याचे निवेदनात नमूद आहे. दरम्यान, बुधवारी यावल शहरातील बुरुज चौकातुन शेकडो युवकांनी मोर्चा काढुन व्यापार्‍यांना आपली दुकाने बंद करण्याचे शांततेत आवाहन केले व व्यापारी बांधवांनी त्यास प्रतिसाद दिला. यावेळी पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !