डांभूर्तीतील युवकाची पत्नी विरहाने आत्महत्या


Youth in Dambhurti commits suicide by losing his wife डांभूर्णी : गावातील पंडित नगरातील रहिवाशी योगेश रमेश कोळी (37) या युवकाने शुक्रवार, 8 रोजी दुपारी आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीच्या विरहातून या युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वीच पत्नीने सोडले होते घर
सुमारे दोन महिन्यांपूर्वीच योगेशची पत्नी घर सोडून गेल्याने योगेश चिंताग्रस्त झाला होता शिवाय पत्नी हरवल्याची तक्रारही यावल पोलिसात दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी घरात कुणीही नसताना योगेशने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेतला मात्र याचवेळी ही बाब आईच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर मोठ्या भावासह गल्लीतील नागरीकांनी डॉक्टरांना पाचारण केले असता डॉ.भूषण पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. योगेश हा खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता.







चिमुकल्यांनी केला मन हेलावणारा आक्रोश
मयत योगेशच्या पश्चात दोन लहान मुले, आई, मोठा भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. सचिन कोळी यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार वासुदेव मराठे करीत आहेत. दरम्यान, मयत योगेशच्या सहा व चार वर्षीय मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर फोडलेला टाहो मन हेलावणारा होता.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !