जळगावात विरुद्ध दिशेने प्रवास करीत दुचाकीची धडक : पादचारी जखमी


जळगाव : राँग साईटने भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकीवरील चालकाने समोरून धडक दिल्याने पायी चालत जाणारा व्यक्ती जखमी झाल्याची घटना बुधवार 6 रोजी सायंकाळी 5.15 वाजता अजिंठा रोडवरील निलांबरी हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी शनिवार, 9 रोजी तक्रारीवरून (दुचाकी क्र. एम.एच.19 डी.डब्ल्यू.1771) वरील चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील भिका महाजन (48, तुकारामवाडी) हे खासगी नोकरी करतात. ते रस्त्याच्याकडेने पायी चालत असताना दुचाकी चालक समोरून वेगात राँग साईटने येत समोरून धडक दिली. त्यांच्या पायाला जबर दुखापत झाल्यानंतरही दुचाकी चालक पसार झाला. गुन्ह्याचा तपास कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !