बस-रीक्षा अपघात : 26 जणांचा मृत्यू


बसमधील मृतांना दहा लाख तर रीक्षातील मृतांना दोन लाख भरपाईची घोषणा : अपघाताच्या चौकशीचे आदेश

कळवण : भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने ती अ‍ॅपे रीक्षावर आदळल्यानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली होती. या अपघातात सुरुवातीला 23 जणांचा मृत्यू झाला होता मात्र उपचार सुरू असताना आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. बसमधील मृत प्रवाशांच्या वारसांना सरकारने 10 लाख रुपये मदतीची घोषणा केली असून अ‍ॅपेतील नऊ प्रवाशांच्या वारसांनाही सरकारने प्रत्येकी दोन लाख मदतीची घोषणा केली आहे. बस अपघातातील जखमींना उपचारार्थ पाच लाख रुपये दिले जाणार असून बुधवारी पालकमंत्री छगन भुजबळ व मंत्री परब यांनी जखमींची विचारपूस केली तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !