बँकेत जाण्यासाठी निघाला मात्र अचानक रेल्वेखाली केली आत्महत्या : आव्हाणीत खळबळ
He left to go to the bank but suddenly committed suicide under the train: Excitement in the challenge जळगाव : धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावातील 22 वर्षीय तरुणाने बँकेत जात असल्याचे सांगून घर सोडले मात्र नंतर रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. पवन राजेंद्र बाविस्कर (वय 22, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) असे मयताचे नाव आहे. ही घटना सोमवार, 11 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे पवन बाविस्कर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याने पदवीपर्यंचे शिक्षण घेतले होते. सोमवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी त्याने घरच्यांना मी जळगाव येथे बँकेच्या कामानिमित्त जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. त्यानंतर तो कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ येवून त्याने जळगाव ते पाळधी दरम्यान अपलाईनवर खांबा क्रमांक 301/ 7 ते 9 दरम्यान, रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








