जळगावात दुचाकी चोरट्यांनी मांडला डेरा : वाढत्या चोर्यांनी दुचाकी चालकांमध्ये भीती
Two-wheeler thieves set up camp in Jalgaon : Fear among two-wheeler drivers due to increasing number of thieves जळगाव : शहरात दुचाकींच्या चोर्या वाढल्याने दुचाकीस्वारांमध्ये भीती पसरली आहे. सातत्याने दुचाकी चोर्या सुरू झाल्याने वाहनधारकांनी आता चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दुचाकी चोर्या झाल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हापेठ हद्दीतून दुचाकी लांबवली
गौरव दिनेशचंद्र पाटील (20) हा तरूण ममुराबाद येथे वास्तव्यास आहे. तो शिक्षण घेतो. कामानिमित्त त्यांची दुचाकी असून ती (एम.एच.19 बी.के.3875) घेवून तो शुक्रवार, 8 रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास जावळे हॉस्पिटल याठिकाणी आला. हॉस्पिटलसमोर दुचाकी लावून हा तरूण रुग्णास भेटण्यास निघून गेला. रात्री आठ वाजता तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला असता त्याला दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी गौरव पाटील याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक सुवर्णा तायडे करीत आहे.






सुवर्ण कारागीराचे दुचाकी लांबवली
दुसर्या घटनेत श्रीकांत शिवनारायण भुतडा (62, प्रेमनगर) हे दागिण्यांचे कारागीर आहेत. 28 जुलै 23 रोजी सायंकाळी ते कामासाठी (क्र.एम.एच.19 टी. 8072) ते दुचाकीने शिरसोली रोडवरील गुंजन मंगल कार्यालय गजानन मंदिराजवळ आले व त्यांनी दुचाकी लावून कामाचे ठिकाण गाठले मात्र रात्री 9.30 वाजता ते दुचाकी घेण्यास आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परीसरात शोध घेतला मात्र काही एक तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विकास सातदिवे करीत आहेत.


