एमआयडीसी हद्दीत अपघातात मयत झालेला तरुण उमाळ्यातील रहिवासी
A young resident of Umala died in an accident in MIDC limits जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाची ओळख पटवण्यात यश आले असून हा तरुण उमाळ्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्ञानेश्वर महारू पांगारे (30) असे मृत तरूणाचे नाव आहे.
अपघातात तरुणा झाला मृत्यू
सोमवारी ज्ञानेश्वर या तरुणाला अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर तत्काळ 108 क्रमाकांच्या रूग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलीस डायरीत अनोळखी तरूणाचा मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






सोमवारी महारू पांगारे यांनी रूग्णालयात येऊन मयतास पाहिल्यानंतर मयत हा ज्ञानेश्वर आपला मुलगा असल्याचे ओळख पटवत टाहो फोडला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यत देण्यात आला. ज्ञानेश्वर याचा मृत्यूची वार्ता कळाल्यानंतर परीवारातील सदस्यांना जबर धक्का बसला. तपास विजय पाटील तसेच पंकज पाटील करीत आहेत.


