बुलढाणा जिल्ह्यातील सराईत घरफोडे मुक्ताईनगर पोलिसांच्या जाळ्यात
Muktainagar police in Sarai house burglary in Buldhana district मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिसांनी घरफोडी प्रकरणी तिघा सराईत गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून अटक केली आहे. संशयितांकडून 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशाल श्रीराम वावरे (22, सोनाळा, ता.संग्रामपूर) , आकाश रामेश्वर धामोळे (22, टुणकी, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा) व विशाल गणेश विटेकर (22, दुणकी ता.संग्रामपुर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विकास नायसे, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर, प्रशांत चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विकास नायसे करीत आहेत.








