तर रावेर लोकसभा निवडणूक लढवणार : आमदार एकनाथराव खडसेंचा दावा
Raver will contest the Lok Sabha elections: MLA Eknathrao Khadse claims जळगाव : गेल्य 30 वर्षांपासून आमदार असलेले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रावेर लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसने रावेर लोकसभेसाठी उमेदवार दिला मात्र एक वेळचा अपवाद वगळता अनेकदा लाखोंच्या मताने या मतदारसंघात उमेदवार पराभूत झाला आहे त्यामुळे आघाडीने राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास व आपल्याला उमेदवारी मिळाल्यास निश्चितपणे रावेर लोकसभेची जागा ताकदीने लढवू व विजयी होवू, असे सुतोवाच आमदार एकनाथराव खडसे यांनी केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे ?
पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सुमारे 10 निवडणुकांनंतर काँग्रेस ही जागा लढवत आहे. तेरा महिन्यांत एक निवडणूक वगळली तर काँग्रेसला येथे यश मिळालेले नाही त्यामुळे काँग्रेस उमेदवार येथे लाखो मतांच्या फरकाने पराभूत झाला आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास व पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास आपण या जागेवर ताकदीने निवडणूक लढणार आहोत.

रावेर लोकसभेत एल फॅक्टरची जादू
आमदार खडसेंच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे रावेर लोकसभेसाठी दोन टर्मपासून खासदार आहेत तर यंदा भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे असतील वा अन्य कोण असेल हे अद्याप अस्पष्ट आहे. रावेर लोकसभेत सर्वाधिक लेवा समाज व मराठा समाजाचे प्राबल्य आहे. आमदार एकनाथराव खडसेंचा लेवा समाजावर प्रभाव असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्गही येथे आहे त्यामुळे आघाडीच्या बैठकीत ही जागा कुणाला सुटते त्यावर यशापयशाची गणिते अवलंबून राहणार आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीनं घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

