पारोळा पोलीस ठाण्यातच आठ हजारांची लाच घेणार्या फौजदाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी
Faujdar who took bribe of 8000 in Parola police station was remanded to police custody for two days पारोळा : गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्यात नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच मागून ती पोलीस ठाण्यातच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार जयंवत प्रल्हाद पाटील (54) यास जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी साडेचार वाजता अटक केली होती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मुख्यमंत्री एकीकडे जिल्ह्यात आले असताना फौजदाराने चक्क पोलीस ठाण्यातच लाच घेण्याचे धाडस केल्याने पोलीस वर्तुळात या सापळ्याची विशेष चर्चा होती. आरोपी फौजदाराला बुधवारी दुपारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
20 हजारांच्या लाचेनंतरही सुटला नाही पैशांचा मोह
अंचाळे, ता.धुळे येथील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात गुन्हा रजि. नंबर 344/2023, भादंवि कलम 324, 323, 341, 342, 427, 504, 506, 34 प्रमाणे 12 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र तातडीने पाठवण्यासाठी सुरूवातीला लाचखोर फौजदाराने 30 हजारांची मागणी केल्यानंतर सुरूवातीला 20 हजार रुपये स्वीकारले मात्र त्यानंतर लाचेची हाव थांबली नाही व पुन्हा उर्वरीत 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आठ हजार रुपये देण्याचे ठरले व तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवारी दुपारी साडेचार वाजता पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताच जयवंत पाटील यास अटक करण्यात आली.








