भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात 15 रोजी राष्ट्रीय परीषद


भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान व पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यलयातील संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी नववी राष्ट्रीय परीषद आयोजित करण्यात आली आहे. या परीषदेसाठी 50 पेक्षा अधिक नोंदी झालेल्या आहे.

या परीषदेस विविध राज्यातून संशोधक आपले शोधनिबंध सादर करतील. या संशोधनासाठी आवश्यक असे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक विषय तज्ञांकडून करण्यात येणार आहे. या परीषदेसाठी संशोधकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन नाहाटा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील व परीषदेचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !