जळगावातील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय : हॉटेल व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा


Prostitution business in lodge in Jalgaon: Crime against five persons including hotel manager जळगाव : लॉजआड सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. याप्रकरणी हॉटेलच्या व्यवस्थापकास कर्मचार्‍यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील नवीन बस स्थानका शेजारी असलेल्या चोपडा मार्केटमधील लय भारी हॉटेलवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथक तयार करून चोपडा मार्केट येथे रवाना केले. तेथील हॉटेल लयभारी येथे बनावट ग्राहक पाठवून पोलिस आत गेले असता मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाल्याने पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकत पाच महिलांसह पाच पुरुषांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







हॉटेलचा व्यवस्थापक सागर बापू अहिरे (28, रा.जिसगाव, जि.नाशिक), हॉटेल कामगार सोमनाथ बबन पवार (22, रा.उमराणा, जि.नाशिक), जयेश उर्फ पाच्या देविदास तायडे (27, रा.हरीओम नगर), किरण विजय सुरवाडे (30, रा.तांबापुरा), प्रवीण अहिरे (संपूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालक अद्याप पसार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !