चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरटा
A two-wheeler thief caught in the net of Chalisgaon city police चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात चोरट्याला अटक केली आहे. मोहयीन शेख कादर मणियार (32, कजगाव, ता.भडगाव) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. संशयिताने चाळीसगाव शहरातील सिग्नल चौक परीसरातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.
यांनी आवळल्या मुसक्या
चाळीसगाव शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे आदींनी ही कारवाई केली. तपास हवालदार योगेश बेलदार व निलेश पाटील हे करीत आहेत.








