साडेपाच लाखांच्या चोरीतील मुद्देमाल तक्रारदाराला परत


भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी उघडकीस आणला होता गुन्हा

भुसावळ : अप पुरी एक्स्प्रेसमधून साडेसहा लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरीची घटना 4 डिसेंबर 2019 रोजी पहाटे दोन वाजता गाडीने भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर घडली होती. लोहमार्ग पोलिसांनी अमरावतीमधील दोघा आरोपींना शिताफीने अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने लोहमार्ग पोलिसांना तक्रारदारास परत दिला आहे.

साडेसहा लाखांच्या चोरीची उकल
अप 18421 पुरी-अजमेर एक्स्प्रेसच्या कोच ए- 1 च्या अर्थ 45 व 46 वरून तक्रारदार दीपक नरेंद्रभाई कटपिटीया (68, क्यू.701, आरोही क्रेस्ट सुबसेंट्रल गाता, जिमखाना रोड, साऊथ अहमदाबाद, गुजराथ) हे पत्नीसह प्रवास करीत असताना पहाटे दोन वाजेनंतर गाडीने भुसावळ सोडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या पत्नीची लेडीज पर्स लांबवली होती. या पर्समध्ये 30 ग्रॅमचा एक लाखांचा हार, दहा ग्रॅमच्या 30 हजारांच्या बांगड्या, पाच लाखांचा डायमंड हार, 12 हजारांची रोकड व मोबाईल असा एकूण सहा लाख 57 हजारांचा ऐवज होता. लोहमार्ग पोलिसांनी अमरावती येथील इम्रान अन्सारी फयाज अन्सारी (30, मज्जीद बंदर स्टेशनजवळ, मुंबई, ह.मु.कमौला ग्राऊंड, जाकिर कॉलनी, अमरावती) व सय्यद हारून सैय्यद सत्तार (45, पठाण चौक, कमोला ग्राऊंडजवळ, बाबादिन एरीया, पहेलवानची गल्ली, अमरावती) यांना अटक करीत त्यांच्याकडून पाच लाखांचा डायमंड हार, 30 हजारांच्या बांगड्या व मोबाईल मिळून एकूण पाच लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी तक्रारदास हा मुद्देमाल परत देण्यात आला. प्रसंगी लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, उपनिरीक्षक अनिल केरूरकर, हवालदार अजीत तडवी, सुनील पाटील, शैलेंद्र पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !