बहिणीला भेटण्यासाठी जाणार्या भावाचा अपघाती मृत्यू : चाळीसगाव तालुक्यातील घटना
Accidental death of brother on his way to meet sister : incident in Chalisgaon taluka चाळीसगाव : बहिणीला भेटण्यासाठी जरंडी, ता.सोयगाव येथे जाणार्या भावाची दुचाकी रस्त्याच्या डिव्हायडरला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात खडकी शिवारात महामार्गावर घडला. या घटनेने सुंदनगर तांडा गावावर शोककळा पसरली. सोमनाथ बालू जाधव (22, सुंदरनगर तांडा क्रमांक 3, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
बहिणीला भेटण्यापूर्वीच काळाची झडप
दहिवद येथील धर्मा वाघ यांच्या पेट्रोलपंपावर सोमनाथ कामाला होता. मंगळवार, 12 रोजी रात्री 9 वाजता तो जरंडी, ता.सोयगाव येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 डी.डब्ल्यू.4075) वरून जात अताना खडकी शिवारात आराध्या हॉटेलच्या जवळ असलेल्या डिव्हायडरला त्याची दुचाकी धडकली. त्यात त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.








