भुसावळात कंटेनरने महिलेला चिरडले


अपघातानंतर कंटेनर चालकाला पब्लिक मार : रस्त्यांच्या दुरवस्थेने अपघात वाढले

भुसावळ : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने 58 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सतनाम कौर सतरजीतसिंग छाबडा (58, रा.म्युन्सीपल पार्क, भुसावळ) या विवाहितेचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनर चालकास चांगलाच चोप दिला. शहर पोलिसांना अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी धाव घेत जमाव पांगवत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.

अपघातात महिलेचा जागीच मृत्यू
सतनाम कौर छाबडा या दुचाकीने (एम.एच.19 डीएच 8518) गांधी पुतळ्याजवळील गुरूद्वारामध्ये जात असताना जळगावकडून भिंडकडे निघालेला भरधाव कंटेनर (एच.आर.38 एस.6333) ने धडक दिल्याने छाबडा या कंटेनरच्या मागच्या चाकात आल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनर चालक इंद्रसिंग सुरेंद्रसिंग तोमर (मध्यप्रदेश) यास चांगलेच चोपून काढले. अपघाताचे वृत्त कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाची सुटका करीत त्यास पोलिस ठाण्यात आणले तसेच अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. मयत छाबडा या लव्हली ब्युटी पार्लरच्या संचालिका होत्या तर त्यांचे पती तारजीतसिंग छाबडा हे प्रॉपर्टीचा व्यवसाय करताता. मृत सतनाम कौर यांच्या पश्‍चात पती व मुलगा व दोन मुली असा परीवार आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरूविंदरसिंग मलिकसिंग छाबडा यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !