शिरसोलीतील तरुणाचा डेंग्यूने घेतला बळी

आई-वडिलांसह दोघं बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !


A young man from Shirsoli died of dengue जळगाव : डेंग्यूच्या आजाराने शिरसोली प्र.बो. येथील देवेंद्र विकास बारी (19) या तरुणाचा खाजगी रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेविरुद्ध शिरसोलीत संताप व्यक्त होत आहे.

खाजगी रुग्णालयात मालवली प्राणज्योत
जळगाव शिरसोली प्र. वो. येथील बारी नगरात तालुक्यातील देवेंद्र बारी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







कुटूंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघून आई-वडिलांसह बहिणींनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. वडीलांना इलेक्ट्रीक कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. दरम्यान, गावकर्‍यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप होत आहे. मयत तरुण राहत असलेल्या परीसरात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे देवेंद्रला डेंग्यू झाल्याचा आरोप आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !