एमआयडीसी पोलिसांची सतर्कता : आत्महत्येपूर्वीच महिलेस दिले जीवनदान
MIDC police vigilance : Life donation given to woman before suicide जळगाव : जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीतील महिला आत्महत्या करण्यासाठी मेहरुण तलावावर निघत्तल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सूचना मिळताच वेळीच धाव घेत या महिलेला जीवनदान दिले. ही घअना शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली. एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. या घटनेत सोनाली काळू मते (34, रा.गणेश नगर, जिल्हापेठ) या महिलेचे प्राण वाचले.
कार्य तत्परतेचे होतेय कौतुक
जळगाव शहरातील मेहरुण तलाव येथे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास जात असताना शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास काही लोकांनी पाहिले. त्यांनी तात्काळ याची खबर 112 क्रमांकावर डायल करून पोलिसांना दिली. याची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन पाटील, चंद्रकांत पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी सोनाली यांना पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्या आई व मावशी – सत्यभामा संतोष पाटील, (65, नवीन जोशी कॉलनी, जळगाव) यांच्या सुरक्षितरीत्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.








