चाळीसगाव एमआयडीसीतील कारखान्यात चोरी : 55 हजारांचे साहित्य लंपास
Theft in a factory in Chalisgaon MIDC : Material worth 55 thousand looted चाळीसगाव : चाळीसगाव शहरालगत असलेल्या एमआयडीसीतील मॉर्निसा बायो-ऑर्गेनिक्स प्रा. लि. या कंपनीच्या आवारातून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लोखंडी ड्रील मशीन व पाईपाचे प्लेंच असा 55 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीवरून आले चोरटे
सचिन केशव नागरे यांचा एमआयडीतील मॉर्निसा बायो-ऑर्गेनिक्स कंपनीत गुळ निर्मिती तसेच गुळ पावडर तयार करण्याचे उत्पादन करतात. बुधवार, 13 रोजी रात्री 10 वाजता कंपनीच्या कंपाउंड बाहेर दोन इसम त्यांच्या मोटार सायकलवर काहीतरी अवजड वस्तु घेवुन जात असल्याची माहिती मिळाली असता नागरे यांच्यासह कामगारांपनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी अवजड वस्तु तेथेच सोडून पळ काढला. तेथे पळून गेलेल्या इसमाचा मोबाईन आढळून आला तसेच लोखंडी ड्रील व प्लेंच असे मिळुन आले.






यापूर्वीसुध्दा कंपनीचे आवारातील लोखंडी प्लेट, चॅनल, पाईप असे साहित्य चोरीस गेले आहे. याच चोरट्यांनी यापूर्वी कंपनीत चोरी केल्याचा संशय आहे. चोरट्यांनी 40 हजार रूपये किंमतीचे लोखंडी ड्रील मशीन व 15 हजार रूपये किंमतीचे लोखंडी स्टेलनेस स्टील धातुचे नट बोल्ट असलेले पाईपाचे प्लेंच असा 55 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


