चाळीसगावात प्लास्ट ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तीद्वारे प्रदूषण : दोन कारखान्यांना दहा हजारांचा दंड


Pollution by Plaster of Paris Ganesha idol in Chalisgaon : Two factories fined Rs 10,000 चाळीसगाव : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्ट ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्त्या बनविणे व विक्री करणे बंदी असल्याने चाळीसगाव नगरपालिकेच्या पथकाने शहरातील मालेगाव रस्त्यावरील गणेश मूर्त्या बनवणार्‍या कारखान्यांवर छापे टाकून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती विक्री करू नये, असे पालिकेने बजावले आहे.

कारवाईने उडाली खळबळ
गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा केला जावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने केली जाते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकारी यांनी दिेलेल्या सुचनेच्या अनुषंगाने चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील गणपती मूर्ती तयार करणार्‍या मालेगाव रस्त्यावरील दोन कारखान्यांना मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक बंदी टीम प्रमुख दिनेश जाधव, प्रेमसिंग राजपूत, नितीन सुर्यवंशी, सूमित सोनवणे, मुकादमा किरण मोरे यांच्या पथकाने भेटी देवून पाहणी केली. या कारखान्यांनी प्लास्टीक बंदी कायद्याचे उल्लंघण केल्याने त्यांच्यावर प्रत्येकी 10 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयद्वारा घोषीत प्लास्टीक कचरा व्यवस्थापन (संशोधन) अधिनियम 2021 व महाराष्ट्र प्लास्टीक आणि थर्माकोल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, साठवणूक बंदी) अधिनियम 2018 नुसार एकल वापर प्लास्टीक वस्तु व साहित्यावर बंदी असल्याने आणि या बंदीची अंमलबजावणी करणे अनिवार्य असल्याने पर्यावरणाचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी गणेश मूर्त्या बनविणे व विक्री करणे बंदी असल्याने चाळीसगाव नगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली त्यामुळे प्लास्टर व पॅरीस गणेश मूर्ती तयार करून त्या विक्री करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नगरपालिकेने दिला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !