जळगाव जिल्हा कारागृहातून खुनातील कैद्याचे भर दिवसा पलायन : पाठलागाअंती आवळल्या मुसक्या


Murder prisoner escapes from Jalgaon District Jail in broad daylight : Smiles after the chase जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहातून खुनाच्या आरोपीतील कैद्याने जेलमधील पोलीस कर्मचार्‍याला धक्का देत पलायन केले मात्र आरडा-ओरड केल्यानंतर पाठलागाअंती संशयिताला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच शिताफीने पकडण्यात यश आले. विजय चैनाम सावकारे (23, रा.चुंचाळे. ता.यावल) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. हा धक्कादाकयक प्रकार शनिवार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडला. संशयिताविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिपायाला धक्का देत केले पलायन
निवृत्ती काशिनाथ पवार हे कारागृहात शिपाई म्हणून नोकरीस आहे. शनिवारी सकाळी ते कर्तव्यावर असता सव्वासहा वाजेच्या सुमारास कारागृहाचा दरवाजा बाहेरुन कोणीतरी ठोठावल्यानंतर पवार यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना कोणीही दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहताच कारागृहातील बंदी विजय सावकारे याने धक्का देत कारागृहाच्या मेनगेटमधून पळ काढला.







क्षणार्धात हा प्रकार घडल्याने कर्मचार्‍यांनी आरडा-ओरडा करत पळालेला बंदी विजय सावकारेचा पाठलाग सुरू केला. याचवेळी कारागृहाकडे येत असलेले कारागृह शिपाई अनंत केंद्रकर व गणेश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख् प्रवेद्वारावर संशयिताला पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा त्याची कारागृहात रवानगी केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्हा कारागृहात गेल्या दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात विजय चैत्राम सावकारे हा बंदी म्हणून कोठडीत असल्याची ामहिती आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !