धानोरा शहरात एकाचवेळी सात दुकानांसह घर फोडले
A house along with seven shops were broken into simultaneously in Dhanora town धानोरा, ता.चोपडा : एकाचवेळी चोरट्यांनी सात बंद दुकानांसह एका घराला टार्गेट केल्याची घटना धानोरा शहरातील यावल रस्त्यावरील बसस्थानक परीसरात शुक्रवारी रात्री घडल्यानंतर खळबळ उडाली तर चोरट्यांनी लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडल्याने परीसरात खळबळ उडाली.
वील गुल होताच चोरट्यांची चांदी
शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होता व नेहमीप्रमाणे वीजपुरवठाही बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. यावल बसस्थानक परीसरातील अमरदीप गुजर यांचे सूर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र, राजेंद्र चौधरी यांचे कांचन त्याने प्रिंटर्स जनरल स्टोअर्स, अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व सद्गुरू दूध उत्पादक सोसायटी ऑफिस व शेजारील खोली असलेल्या या सर्व दुकानांची टॉमीने कुलूपे तोडून रोख रक्कम, चिल्लर लांबवण्यात आली तसेच लक्ष्मी नगरातील गोकुळ कुंभार यांचे बंद घरात चोरी करण्यात आल्याने खळबळ उडाली.






पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा व्यापार्यांचा आरोप
अनेक दुकानदारांच्या दुकानातील चिल्लर तसेच सूर्यवंशी टी स्टॉलमधून दोन हजार रुपये व सिगारेटची पाकिटे असा ऐवज चोरट्यांनी लांबवला. पहाटे चार वाजता प्रशांत अंबादास महाजन हा दूध काढण्यासाठी जात असताना चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दुकानदारांना कळवले. दुकानदारांनी आपल्या दुकानांकडे धाव घेत पोलिस पाटील रवींद्र कोळी यांना बोलावून घेतले. त्यांनी पाहणी करून तत्काळ अडावद पोलिस ठाण्यात माहिती दिली. सात ते आठ दुकानांचे कुलूप तोडून चोरीची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी न करता, या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.


