पाचोर्‍यात खळबळ : लग्न न करणार्‍या तरुणावर तरुणीनेच केला चाकूने हल्ला


Excitement in Pachorya: An unmarried young man was attacked with a knife by the young woman herself पाचोरा : शहरातील एका तरुणावर लग्न करीत नसल्याच्या कारणावरून एका तरुणीने चाकूचे वापर करीत हल्ला केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. जखमी तरुणावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणीविरुध्द गुन्हा दाखल होताच तिला अटक करण्यात आली.

असे आहे चाकूहल्ला प्रकरण
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका कॉलनीत राहणार्‍या तरुणाविरुद्ध बसस्थानक रोड परीसरातील तरुणीने 2013 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या तरुणीने अनेकवेळा तरुणाकडे माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला. त्यानंतर तरुणाला नोकरी लागली असून या तरुणीने तेथेही जाऊन त्याला लग्नाचा आग्रह केला होता. ही माहिती तरुणाने त्याच्या बहिणीला दिली होती. दरम्यान, शुक्रवार, 15 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास तरुणाच्या घराबाहेर येऊन या तरुणीने आरडाओरड व शिवीगाळ केली. या वेळी तरुणाच्या आईने त्या तरुणीला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तरुणीने चाकू काढून महिलेवर हल्ला करणार तोच त्यांच्या पतीने तरुणीला रोखले. त्यांनाही या तरुणीने लाथ मारली.







पोलीस येताच तरुणीचे पलायन
यावेळी त्या तरुणासह परीसरातील नागरीकांनी तरुणीला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यावेळी पुन्हा लग्नाचा आग्रह करीत या तरुणीने त्या तरुणावर चाकूने सपासप वार केले तसेच सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी काही नागरीक तरुणीला समजवायला गेले असता त्या तरुणीने त्यांच्यावरही हल्ला चढवला. दरम्यान, ही माहिती कळताच पोलीस गाडी तेथे पोहोचली. परंतु, गाडीचा सायरनचा आवाज ऐकताच तरुणीने धूम ठोकली. या प्रकरणी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरुन संबंधित तरुणीविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या तरुणीस ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल मोरे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !