धक्कादायक ! : तरसोद फाट्यावरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
Attempt to break HDFC Bank ATM at Tarsod Phata जळगाव : सीसीटीव्ही कॅमेर्यांची तोडफोड करीत तरसोदजवळील एमटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. नशिराबादजवळील तरसोद फाट्यावर एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी गेटचे लॉक तोडून एटीएम मशीनचे कुलूप तोडून रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. हा प्रकार शनिवार, 16 रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काही वर्षांपूर्वी झाली होती चोरी
तरसोद फाट्यावर एचडीएफसी बँक तसेच एटीएम मशीनची कॅबीन आहे. या ठिकाणी बँकेचे शाखा अधिकारी प्रशांत जगन्नाथ पाटील आहेत तर राजेंद्र सपकाळे हे सुरक्षा कर्मचारी आहेत. शुक्रवार, 14 रोजी रात्री नेहमीप्रमाणे बँकेने गेटला कुलूप लावून बंद केले मात्र मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी एचडीएफसी बँकेला लक्ष्य केले.






गेटचे लॉक कापून केली एन्ट्री
चोरट्यांनी याठिकाणी येताच बँकेच्या गेटचे लॉक कापले. त्यानंतर आत प्रवेश केला. चेहरे व ओळख पटू नये ,म्हणून चोरट्यांनी सुरूवातीलाच बँकेने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची तोडफोड केली. त्यानंतर एटीएम मशीशनचे लॉक तोडले मात्र चोरट्यांचा हेतू सफल झाला नाही. घटनेची माहिती कळताच शाखा मॅनेजर प्रशांत पाटील यांनी बँकेत धाव घेतली. नशिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकाराची खबर दिली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे तसेच पीएसआय संजय जाधव व कर्मचार्यांनी बँकेला भेट देऊन पाहणी केली.


