जळगाव एमआयडीसीत गोदाम फोडून 70 हजारांचा मुद्देमाल लांबवला
70,000 worth of goods were stolen by breaking into a warehouse in Jalgaon MIDC जळगाव : एमआयडीसीतील गोपाल दालमिलजवळील गोडावून फोडून चोरट्यांनी 17 हजार रोख तसेच कॉपर वायरचे बंडल, अॅल्युमिनीअमचे लग, आर्थिंग पट्टी असा सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिवार, 16 रोजी तक्रारीवरून गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याांविरोधात गुन्हा दाखल
विलास डिंगबर महाले (52) रा.जोशीपेठ जळगाव यांचे दालमिलला लागून गोडावुन आहे. ढेप व तेलाची ते याठिकाणी विक्री करतात. 28 ऑगस्ट रोजी रात्री गोडावून लॉक करून घरी गेले होते. सकाळी ते आले असता दरवाजा उघडा व लॉक तोडलेले दिसले. चोरट्यांनी 17 हजार 240 रूपयांची रोकड, 30 हजार रुपयांचे पॉलीकॅब कंपनीच्या काँपर वायर बंडल 7 नग 10 हजार किमतीचे काँपर व अॅल्युमिनीअमचे लग, 12 हजाराचे अॅल्युनिनीअमचे आर्थिंग पट्टी 1 बंडल असा मुद्देमाल लांबविला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.








