खिर्डीत एका दिवशी तीन चोर्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट
खिर्डी : गावात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चोरट्यांनी एकाच रात्री पान टपर्या, रस्त्यावरील घरांमधून वीज पंप आणि अन्य साहित्य लंपास केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी मध्यरात्री सुपडू शामद पिंजारी यांच्या घरासमोरील वीज पंप, दुचाकीमधील पेट्रोल लांबवले. तसेच पत्रकार शेख इद्रीस यांच्या घरातील वीजपंप चोरण्यासाठी चोरांनी चॅनेल गेट तोडण्याचा प्रयत्न केला. नंतर बलवाडी रोडवरील दत्त मंदिराचे कुलूप तोडून दागिने, तांब्याचे भांडे, कासव तसेच दानपेटीतील रोकड चोरांनी लांबवली. या घटनेतील तीन चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या आहेत. गेल्या वर्षीदेखील कब्रस्तानमधील एलईडी हायमास्ट लॅम्प चोरी झाले होते. त्यानंतर मागील महिन्यात खिर्डी खुर्द मुस्लिम कब्रस्तानमधील हायमास्ट लॅम्पचे सर्व एलईडी दिवे चोरीस गेल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
